…………… तो बाप - TopicsExpress



          

…………… तो बाप असतो बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो पैश्याची जुळवाजुळव करतो ………………..तो बाप असतो सगळ्यांना ने आण करतो स्वयंपाक हि करतो सिजरीन नंतर बायकोला त्रास नको , म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो …………………………….तो बाप असतो चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो …………………………..तो बाप असतो कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो स्वतः फाट्क बनियन घालून तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो ……………………………..तोबाप असतो स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हालाstylish मोबाईल घेऊन देतो तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो ………………………………तो बाप असतो love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो “सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो “बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो ………………………………तो बाप असतो जाताना पोरगी सासरी,धायमोकळूनरडतो माझ्या चिऊला नीट ठेवा असे हात जोडून सांगतो …………….तो बाप असतो.
Posted on: Sun, 21 Jul 2013 15:54:59 +0000

Trending Topics



-height:30px;"> jei football player k jeirokom lage: *Pirlo- Roman
LADKIYON KI KAHANI If v treat her nice she says yaar mujhe

Recently Viewed Topics




© 2015