---------------------------------------- शिक्षक आणि गुरु ---------------------------------------- शिक्षक महत्वाकांक्षा वाढवतात गुरु वाढवतात समाधानी वृत्ती शिक्षक पुस्तकातले धडे देतात गुरु आयुष्य जगण्याची शक्ती शिक्षक मार्कांवर हुशारी ठरवतात गुरु अंगी असणाऱ्या कौशल्यांवर शिक्षक शाळेतल्या वेळेशी बांधील… गुरु मृत्युनंतरही सोबत मार्गावर सारे गुरु हे शिक्षक असतातच… शिक्षक गुरु असतीलच असं नाही अभियान एकच पण क्षेत्र वेगळं कमी-जास्त असा कुठे वाद नाही पण काळ आलाय, वेळही आलीय जागोजागी गुरुकुलं उभारण्याची… डिग्र्यांच्या सुरळ्या गुंडाळून ठेवून माणसातला माणूस जागवण्याची…! ------------ चंद्रकांत पागे (५ सप्टेंबर, २०१३)
Posted on: Thu, 05 Sep 2013 16:33:09 +0000