*****पंचवार्षिक - TopicsExpress



          

*****पंचवार्षिक योजना***** चौथी पंचवार्षिक योजना (गाडगीळ योजना) कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४ प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३) महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973 मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks) पाचवी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९ प्राधान्य : दारिद्र्य निर्मुलन खर्च : प्रस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु. प्रकल्प : १. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM) २. Integrated Child Development Services ३. Desert Development Programme महत्वपूर्ण घटना : १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला. २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर. (१९७६) मूल्यमापन : दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश. राजकीय घटना : २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. जानेवारी १९८० मध्ये कॉंग्रेस (आय) ने सरकती योजना फेटाळली. १ एप्रिल १९८० नवीन सहावी योजना सुरु करण्यात आली. सहावी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५ प्राधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model खर्च : प्रस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु. प्रकल्प : १. Integrated Rural Development Programme (IRDP) २. National Rural Employment Programme (NREP) ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) ५. नवीन २० कलमी कार्यक्रम ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू) महत्वपूर्ण घटना : १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले. मूल्यमापन : हि योजना यशस्वी ठरली. वाढीचा दर ५ टक्क्यापेक्षा अधिक सध्या होण्यास सुरवात झाली.
Posted on: Tue, 16 Jul 2013 09:29:40 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015