20 रु. किलो दराने बटाटा - TopicsExpress



          

20 रु. किलो दराने बटाटा घेतल्यावर ज्याचे बजेट कोलमडते तोच वर्ग 5रु. मधे 30 ग्रॅम वेफर्सचे पाकिट घेतो त्यावेळी कुठे जाते त्याची विचारशक्ती? टोमॅटो घेताना नाके मुरडणारया गृहिणी त्याच टोमॅटोचा सास 200 रु. किलोने आवडीने घेतात. साखर 40 रु. ने केल्यावर काय मोठे संकट कोसळणार आहे? घरगुती वापरासाठी रेशनिंगवर द्याना कमी दराने. परंतु औद्योगिक वापरासाठी जाणारी साखर 50 रु. ने द्या ना. त्याने काय होइल 10 ची पेप्सी 15रु. आणि 10 ची कॅडबरी 15 रु. ला होईल. पण लाखो शेतकरयांच्या जीवनमानात फरक पडेल. सरकारचे अनुदान आणि सबसिडीची भिक नकोय आम्हाला. योग्य भाव मिळाल्यास ग्राहकही सुखी होईल आणि शेतकरीही.
Posted on: Sun, 10 Nov 2013 13:25:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015