Formals मध्ये मन रमायला लागलंय … मित्र थोडेसे धुसर दिसायला लागलेत मेसेजेस थोडेसे फिके पडायला लागले दुनियादारी थोडीशी कळायला लागलेय अन Formals मध्ये मन रमायला लागलंय … कट्ट्याची जागा आता PLATFORM ने घेतलेय Assignments च्या जागेवर Tasks आलेत मित्र आता कलीग्स मध्ये CONVERT झालेत Relatives चे कॉल्स आता घरी DIVERT व्हायला लागलेयत अन Formals मध्ये मन रमायला लागलंय … मस्ती थोडी कमीच झालेय , थोडी जबाबदारी पण वाढलेय ; गप्पा आता DISCUSSION झाल्यात, नात्यांच महत्व आत्ता कळायला लागलंय अन Formals मध्ये मन रमायला लागलंय … मित्र आज-काल ट्रेन मधेच भेटतात , Suggestions आता ते पण देतात "बाकी घरचे कसे आहेत??" असा विचारून मग ते पण माझ्यासारखे शांत वाटायला लागलेत अन Formals मध्ये मन रमायला लागलंय … Textच्या ऐवजी mail आला , Warningच्या ऐवजी Memo आला; मास्तर च्या जागी SIR आलेयत अन Formals मध्ये मन रमायला लागलंय.
Posted on: Thu, 05 Sep 2013 03:01:16 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015