# MPSC साठी महत्वपूर्ण - TopicsExpress



          

# MPSC साठी महत्वपूर्ण महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती.... : *जिल्हे- ३५, *तालुके- ३५८,,*पंचायत समिति- ३४९, *जिल्हा परिषद- ३३ * महानगर पालिका - २३, *नगर परिषदा-२२३, *कटक मंडल-७, *खेडी-२८७५४, नगर पंचायती-३ * महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफलाने - अहमदनगर * महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रपलाने - मुंबई * मुंबई जिल्हयामधे एकही तालुका, ग्राम पंचायात नाही। * महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा जिल्हा- मुंबई. * यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात. * महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे. * नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. * महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. * शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. * महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. * शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. * ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. * तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. * भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. * महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. * रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. * स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक. * कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे. * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. * बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे. * महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात. * महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे. * वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे. * नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. * सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. * महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात. * कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले. * कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे. * भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. * सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला. * डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे. * फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे. * महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली. * माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे. * थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो. * रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. ------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------- # राज्यातील प्रमुख शिखरे * कळसूबाई - १,६४६ मी. * साल्हेर - १,५६७ मी. * महाबळेश्र्वर -१,४३८ मी. * हरिश्चंद्रगड -१,४२४ मी
Posted on: Sat, 16 Nov 2013 14:06:55 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015