Out dated झालंय - TopicsExpress



          

Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना virus लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच cute contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय अन mother नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook................
Posted on: Fri, 25 Oct 2013 05:06:05 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015