TET साठी अखेर ६ काऊंटर - TopicsExpress



          

TET साठी अखेर ६ काऊंटर सुरू म. टा. वृत्तसेवा,जळगाव राज्यात शिक्षकांची पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने टीईटी (टीचर इलिजिबिलिटी टेस्ट) सुरू केली असून,या परीक्षेच्या अर्ज स्वीकृतीसाठी उमेदवारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सुविधांअभावी अर्ज स्वीकृतीतल्या त्रुटीही या वेळी स्पष्ट झाल्या. त्याबाबतमटाने बुधवारी,गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले असता जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,अर्ज स्वीकृतीसाठी सहा काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. काऊंटरमध्ये वाढ केल्याने उमेदवारांची सोय झाली असली तरी आणखीही काही त्रुटी आहेत. याबाबत उमेदवारांनी तक्रारीही केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी टीईटीच्या एकाच केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होत होते. या तारखांना अर्ज स्वीकृती बंद ३,४,५,९,१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना अर्जस्वीकृती ६,७,८ व ११ नोव्हेंबर २०१३ अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर २०१३ विद्यार्थ्यांची सोयीसाठीच पाच काऊंटर सुरू केले होते. मात्र,ते अपुरे पडत असल्याने आणखी दहा काऊंटर वाढवणार आहोत. - शिवाजी पाटील,शिक्षणाधिकारी काऊंटरवर अर्ज पाहिले जात नसून,व्हेरिफिके शनसाठी येथे यावेच लागेल,अशा अटी घातल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत आम्हाला अर्जप्रक्रियेसा ठी हेलपाटे घालावे लागत आहेत. परीक्षेत फक्त पात्रताच बघितली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरूनही ते येथे आणणे कितपत योग्य आहे? - पंकज शिंदे आम्ही डीएड केले. इंटर्नशिप केले. हे करूनही आम्ही अजून पात्रता शिक्षक बनण्यासाठी परीक्षा देणे कितपत योग्य आहे?या परीक्षेनंतर पुन्हा सीईटी द्यावी लागणार,त्याचेही वेगळे शुल्क शासन घेणार आहे. हे कितपत योग्य आहे? - पूजा गव्हाणे मी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सासरहून येथे आले आहे. मला सात महिन्यांचे बाळ आहे. त्याला घेऊन यावे लागले. मात्र,अर्जप्रक्रिया नियोजनशून्य असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतरही इथे कशासाठी यायचे,हेच समजत नाही. - माधुरी चौधरी
Posted on: Sun, 03 Nov 2013 04:41:10 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015