agro planingडॉ. एस. डी. - TopicsExpress



          

agro planingडॉ. एस. डी. सावंतगेल्या आठवड्यामध्ये काही दिवसांसाठी सांगली विभागामध्ये पावसाळी वातावरण होते. येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण थोडेसे ढगाळ जरी राहिले तरी पावसाची कुठेही शक्यता नाही. ढगाळ वातावरण कमीझालेल्या भागामध्ये दुपारचे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वरती जाऊ शकेल. सोलापूर विभागामध्ये तापमान 32 -33 अंश सेल्सिअसपर्यंत तर नाशिक विभागामध्ये 31-32 अंश से.पर्यंत वाढू शकेल. त्याच प्रमाणामध्ये नाशिक व सांगली विभागांमध्ये सकाळचे तापमान 18 -19 अंश, तर सोलापूर विभागामध्ये 20-22 अंशापर्यंत वाढू शकेल. पुणे विभागात शनिवार, रविवारनंतर वातावरण थंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेसकाळचे तापमान 15 अंशांपर्यंत खाली जाऊ शकेल. आता सर्व ठिकाणी छाटण्या झाल्या आहेत. थांबलेल्या पावसामुळे व वाढलेल्या तापमानामुळे सापेक्ष आर्द्रता फार कमी (म्हणजेच 40 ते 60 टक्के) झाली आहे. अशा वातावरणामध्ये खरे पाहता कुठलाही रोग महत्त्वाचा नाही.सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये छाटलेल्या बागांमध्ये शेंडा वाढत असल्यास त्यावर डाऊनी दिसण्याची शक्यता आहे. घनदाट कॅनॉपी असलेल्या ठिकाणी कॅनॉपीच्या आतील भागामध्ये जुनी डाऊनी फुलण्याची शक्यता आहे. तसेच नवीन भुरीचाप्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या विभागामध्ये वातावरण ढगाळ राहील अशा ठिकाणी 40 दिवसांपूर्वी छाटलेल्या बागांमध्ये भुरी वेगाने वाढू शकेल. अशा सर्व ठिकाणी आता भुरीच्या नियंत्रणाला प्राधान्य द्यावे. अजूनही तापमान जास्त कमी झालेले नसल्यामुळे नियंत्रणासाठी सल्फर वापरणे शक्य आहे. सल्फर (80 डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारल्यास अशा वातावरणामध्ये सल्फर भुरीच्या नियंत्रणासाठी चांगले काम करू शकते.कीटकांची अंडी मारण्यासाठीसुद्धा सल्फरचा चांगला उपयोग होतो. सध्याच्या वातावरणामध्ये तुडतुडे वाढतात. कीटकनाशकांच्या सोबत सल्फर दिलेले असल्यास यांचे नियंत्रण चांगले होते, असे पाहण्यात आले आहे.ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पाऊस झालेला आहे, व आता सकाळ संध्याकाळचे तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत राहत असल्यास शेंडा वेगाने वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घड जिरणे, छोटा राहणे, किंवा गळहोणे हे प्रकार जास्त होऊ शकतात. झाडांचा फुटीच्या वाढीचा वेग कमी करण्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. पावडरी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (5 ईसी) एक मि.लि. प्रति लिटर किंवा फ्लुसीलाझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळेल. त्याचबरोबर फुटीच्या वाढीचा वेगहीमंदावेल. विशेषतः दाट कॅनॉपी असलेल्या बागेत भुरी दिसत असल्यास अशा फवारणीने फायदा होईल.डाऊनीसाठी प्रतिबंधात्मक फवारण्यावर भर द्यावा...बागेत डाऊनी मिल्ड्यू कुठेही दिसत नसल्यास डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी फक्त प्रतिबंधात्मक फवारणीवर भर द्यावा. आंतरप्रवाही बुऱशीनाशकांची (डायमिथोमॉर्फ एक ग्रॅम प्रति लिटर किंवा इप्रोवालीकार्ब अधिक प्रोपीनेब हे संयुक्त बुरशीनाशक तीन ग्रॅम प्रति लिटर किंवा मॅन्डीप्रोपामिड 0.6 मि.लि. प्रति लिटर किंवा सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक तीन ग्रॅम प्रति लिटर किंवा फॉस्फरस ऍसिडचे सॉल्ट दोन ग्रॅम अधिक मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करत असताना दोन फवारण्यांतील अंतर छाटणीनंतर पहिल्या 20 दिवसांपर्यंत तीन ते चार दिवस व 20 ते 25 दिवसांनंतर चार ते सहा दिवस असावे. कॅनॉपीची घनता आणि वातावरण पाहून फवारणीतील अंतर कमी जास्त करावे.
Posted on: Thu, 07 Nov 2013 01:48:02 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015