अनंत चतुर्दशी चा दिवस - TopicsExpress



          

अनंत चतुर्दशी चा दिवस ,वेळ सायंकाळी ९ .१५ ,स्थळ : निगडी एक नावाजलेले गणपती मंडळ मोठ्या उत्साहाने आपला भव्य गणपती वाजत गाजत विसर्जनासाठी नेत होते ... पण त्यासाठी त्यांनी पुणे-मुंबई महामार्गाची एक बाजू पूर्ण व्यापली होती ....ढोल ताशाच्या गजरात त्यांना मागे लागलेली रांग आणि त्यांनी वाजवलेले होर्न ऐकू जात नसावेत .. मी पण त्या रांगेचा भाग होतो ....पण एक रिकामी जागा बघून मी माझी बाईक पुढे काढली ,(दिवसभर काम केल्यामुळे घरी लवकर जावेसे वाटत होते ) आणि त्या पथकात घुसलो ..... उत्साही कार्यकर्ता : ओ दादा रस्ता बंद केलाय दिसत नाही का ? मी : कोणी बंद केलाय ? मागे एवढी रांग तुम्हाला दिसत नाही का ? कार्यकर्ता : गणपती मिरवणूक आहे ,रस्ता बंद आहे ,थांबायचं तर थांब (आता एकेरीवर आला ) मी : पण रस्ता गाड्यांसाठी आहे ,तुम्ही असा बंद करून काय चालवलय ? कार्यकर्ता: रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का ? ( इथे माझ्या बापाचा काय संबंध? ) मी : का तुला बाप नाही का ? कि रस्त्यावर नाचतोय ? तो काही बोलणार तेवढ्यात जेष्ठ असा एक कार्यकर्ता आला आणि जाऊ दे रे ...नको वाद घालू ...जाऊ दे त्यांना या लोकांना कोण समजावणार ?आणि कसा समजावणार ?पोलीस तरी कुठे न किती लक्ष देणार ?
Posted on: Fri, 20 Sep 2013 18:20:27 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015