अविनाश गुरव. मित्र हो. - TopicsExpress



          

अविनाश गुरव. मित्र हो. मी अविनाश गुरव आज मी आपल्या पानावरील वाचक पिया (नाव काल्पनिक आहे) हिच अनुभव सांगत आहे. कारण काही लोक फालतू comments करतात, म्हणून तिने आपले नाव सांगू नये अशी विनंती केली आहे. पिया म्हणते, माझ्या office मध्ये संध्याकाळी कर्मचारी कामे करून आवरून घरी निघाले होते. office मध्ये मी आणि माझा एक सहकारी मित्र असे दोघेच होतो. आम्हीही आमची कामे आवरून घराकडे निघणारच होतो. एवढ्यात माझ्या सहकार्माचार्याला कोणाचा तरी call आला. तो बोलत बोलत office च्या बाहेर निघून गेला. मी office मध्ये एकटीच होते. तिथे files वैगरे व्यवस्थित लाऊन ठेवत होते. office च्या आतल्या बाजूला एक fridge आहे. मला तहान लागली होती. म्हणून मी तिथे गेले. मला अजूनही आठवतंय कि त्या वेळी तिथे रोजच्या पेक्षा खूप भयाण शांतता होती. मी पटकन पाणी पिउन बाहेर निघाले. तिथून थोडेच पुढे जाता मला असे जाणवले कि कोण तरी माझ्या मागे येत आहे. मी वळून पहिले तर तिथे कोणीच नव्हते. मला वाटलं मला भास झाला असेल. मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी माझे काम करू लागले. थोड्यावेळाने मला office च्या आतल्या बाजूने कोणतरी हळू हळू बाहेर चालत येत आहे असा आवाज आला. पावलांचा आवाज माझ्याच दिशेने येत होता. मी त्या दिशेला पहात होते. मी बोलणार होते कि कोण आहे तिथे. . . पण कोणीच दिसत नवते. तो आवाज बंद झाला. मी माझ्या सहकार्याची वाट पाहू लागले. कारण मला भीती वाटू लागली होती. तेवढ्यात अचानक office च्या आतल्या बाजूने खुर्ची उचलून ठेवल्याचा आणि table वरील files आणि पुस्तके उचलून ठेवल्याचा आवाज येऊ लागला. मी हिम्मत करून आत गेले. मी सर्व दिशेला पहिले. आत कोणीच नवते. तेवढ्यात मागच्या बाजूने जीना चढून कोणतरी आत जात होते. मी मागच्या बाजूला पाहिले. तिथे कोणतरी मुलगी किवा बाई पैंजण घालून धावत आहे असा आवाज ऐकू येऊ लागला. आणि पुढच्या क्षणी कोणाचा तरी कर्कश किंचाळण्याचा आवाज आला. आता मात्र माझा सगळा थरकाप होऊ लागला. मी office च्या बाहेर पळत आले. office च्या बाहेर watchman होता. मी त्याला विचारला कि कोण बाई आत किवा वर गेली होती का, आणि कोणी किंचाळल्याचा आवाज आला काय ? तो watchman काही बोलायलाच मागेना कि जागेवरून हलेचना ! ! इतक्यात माझा सहकारी आला. मी त्याला आतमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्याने मला जे सांगितला ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मला सांगितला कि office मध्ये काम करणाऱ्या एका माणसाने office मध्येच काम करणाऱ्या एका बाइवर बलात्कार करून खून केला होता आणि स्वतःसुद्धा फाशी घेऊन आत्महत्या केली होती. company वाल्यांनी पैसा दाबून हा matter close केला होता.आणि जो अनुभव मला आला होता तो खूप लोकांना आला होता. पण कोणाला काही झाले नाही. मला हे सगळ समजताच मी job सोडून दिला. आजही मला तो प्रसंग आठवला कि मनात भीती दाटून येते. हि होती पियाची गोष्ट. आपला मित्र अविनाश गुरव आपल्याला पितृ-पक्षाबद्दल महत्वाची माहिती सांगत आहे .. ती अशी ... खरे समजा वा खोटे ......अंधश्रद्धा समजा हव तर ..... वर्षातील सर्वात जास्त अपघात-अपमृत्यू किंक्रांत-होळीचा करी दिवसआणी सर्वपित्री अमावस्येलाच होतात ...भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे. समाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.....
Posted on: Thu, 17 Oct 2013 18:05:57 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015