एक प्रेमकथा........ अतुल आणि - TopicsExpress



          

एक प्रेमकथा........ अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेँड्स होते,पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले, जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला,चार पाच वर्षांच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली,पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्याने तिथे ओळखीचं असं नव्हतंच कोणी. पण मुंबईत गेल्यावर कळलं कि इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे.काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्ता शोधुन काढला.घरात प्रवेश करताच त्याला जयश्री दिसली.जयश्रीचा रिकामे कपाळ पाहुन त्याच्या मनात काहुर निर्माण करुन गेलं. अतुलला पाहुन जयश्रीलादेखील आश्चर्य वाटलं.पण थोड्या वेळेच्या शांततेनंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं. ती म्हणाली,आमच्या लग्नांनंतरच्या वर्षांत एका अपघातात ते गेले.. तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला. शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता. त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी तिला सांगितली पण जागेची अडचण आहे . हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली, तु इथेच राहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल. पण तो म्हणाला,अगं पण तुझे मिस्टर नाहित ना आता, त्यामुळे लोक उगाच गैरसमज करुन घेतील त्यामुळे नको. अरे लोकांना हजार तोंड असतात,पण सत्य तर एकच असतं ना? त्यामुळे तु इथे बिनधास्त राहा मी लोकांची परवाह नाही करत.. त्यानंतर ते दोघे एकत्रच राहु लागले..दोघांचेह ी working periods जवळ जवळ same असल्याने ते एकत्र जेवण घेऊ लागले,एकमेकांसोबत वेळ घालवु लागले.कंटाळवाणं आयुष्य जगणार्या जयश्रीच्या जीवनात रंग चढु लागला,एकमेकांसोबत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे भासु लागले. अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा.म्हणुन जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलवर ठेवुन जायची.नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा. हळुहळु त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली.लोक त्यांच्या विषयी कायकाय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही. अतुल हळुहळु जयश्रीच्या प्रेमात पडला होता.शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली. जया लगेच त्याच्यावर भडकली,मी तुला फक्त एक चांगला मित्र मानत होते, पण तु असं बोलुन आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस.एका विवाहीत स्त्रिला असं विचारणं तुला शोभतं का अतुल? अगं पण तुझा नवरा या जगात नाहीये,आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर... पण मला हे मंजुर नाहीये,मी माझ्या नवर्यावर अजुनही खुप प्रेम करते,आणि मी त्याला विसरु शकत नाही.. . ठीकेय तुझी जी इच्छा असेल ती मला मान्य आहे,असं बोलुन तो झोपी गेला. सकाळी जया उठुन त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन जॉबवर निघुन गेली.दुपारी launch time मध्ये जेव्हा ती घरी आली तेव्हा तो नाष्टा तसाच टेबलवर होता.आणि एक चिठ्ठी तिथे होती.त्यामध्ये त्याने आत्तापर्यँत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते.आणि तो तिथुन निघुन गेला होता. तिने अतुल जिथे काम करतो तिथे त्याची चौकशी केली,पण कळलं कि अतुल राजीनामा देऊन काम सोडुन गेला आहे. दिवसामागे दिवस जात होते,तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली. जेवताना त्याच्या बरोबर केलेली मस्ती,एकमेकांसोबत केलेले छोटेमोठे वाद तिला आठवु लागले. हळुहळु तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत गेलं,त्याची आठवण सतावु लागली.सर्व गोष्टी समोर असायच्या पण मन सैरभैर असायचं.कशातच लक्ष लागेनासं झालं.तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीणिला सांगितलि तर मैत्रिणीने सांगितलं की,तुझं प्रेम जडलंय त्याच्यावर.जर खरंच या परिस्थितीतुन तुला बाहेर यायचं असेल,तर अतुलशी तु लग्न करुन टाक.आणि तसंही तु या समाजाला जुमानत नाहीस,त्यामुळे त्यांची तु अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस.तिचं म्हणणं जयाला पटलं. दिवसभराची रजा टाकुन ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली.तिथे त्याची म्हातारी आई होती. याआधीही आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच.अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या,तो सकाळपासुन बाहेरच आहे,कुठे गेलाय ते नाही माहीती. हळुहळु वेळ पुढे सरकत होती,जया त्याची वाट पाहत होती.जेवणेही त्यांनी उरकुन घेतली.पण अतुल अजुन आला नव्हता.सायंकाळचे चार, चाराचे पाच वाजले. दुसर्या दिवशी कामावर हजर राहायचं होतं.शेवटी वैतागुन जयाने आईँचा निरोप घेतला,आणि ती मुंबईच्या गाडीत बसली.गाडी चालु झाली,त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती. गाडीतुन जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं,जुन्या आठवणी त्याज्या झाल्या.गाडी थां गेट,क्लास हे बघुन आपण केलेला दंगा,मागे बसुन मैत्रीणीँच्या काढलेल्या खोडी,कॉलेजचे तास चुकवुन कॅँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवु लागल्या. .त्या निश्चल स्टेजकडे पाहुन अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला,ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं.जे तिला प्रचंड आवडलं होतं.बंद वर्गाँवरून नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती,ज्याचा दरवाजा उघडा होता,तिला ज कदाचित तिथे कोणीतरी असावं.ती आत गेली,तर खिडकीतुन सुसाट येणार्या वार्याने एका बॅँचवर ठेवलेली एक notebook जिची पाने आपोआप पलटत होती.तिने ती खिडकीची दारे बंद केली,आणि ती notebook आपल्या हाती घेतली.जेव्हा तिने पाहीलं कि यात लिहीलेली कविता कुठेतरी वाचली आहे.तेव्हा तिच्य आलं कि ही कविता अतुलनेच लिहीली होती,जेव्हा college चा शेवट दिवस होता. त्याच वेळी ही कविता त्याने सर्वाँसमोर वाचली होती.त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कि अतुल ईथेच कुठेतरी आहे.तिने कॉलेजभर त्याची शोधाशोधसुरु केली.तो कुठे सापडत नव्हता.शेवटी ती टेरेरेस वर त्याचा शोध घेत गेली.अतुल टेरेरेसच्या कडावंर दोन हात टेकवुन,येणार्या हवेची झुळुक डोळे झाकुन अनुभुवत होता,त्याला पाहताच जयाच्या डोळ्यातले अश्रु थांबले नाहीत.आणि आनंदाच्या भरात तिने पळत जाऊन अतुलला मागुन मिठी मारली. अतुलचे डोळे मिटलेलेच होते.तो म्हणाला,आलीस तु, किती वाट पाहीली तुझी.मला माहीती होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता. काय जादु आहे या प्रेमात.... आता नाही ना सोडुन जाणार मला? नाही रे माझ्या राजा,कधीच नाही. तु दुर गेल्यानंतर कळलं,कि तु किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या... त्यामुळे मी कधीच तुला नाही सोडुन जाणार....... मित्रांनो ही होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी,अतुल ने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज,आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवसरोप होईल,रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा म्हणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याला त्याचं प्रेम मिळवुन दिलं.
Posted on: Wed, 17 Jul 2013 08:32:36 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015