एक प्रेयसी पाहिजे, - TopicsExpress



          

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी; अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी. एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी, एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी; पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी; आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी. एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी; मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी..... *मला अशी मुलगी भेटेल का कधी..? https://facebook/pages/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-Amhi-Paus-Vede-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87-/189352987780385
Posted on: Thu, 06 Jun 2013 16:58:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015