कोकण - TopicsExpress



          

कोकण नामा....................................अर्थात गोष्ट एका गुरूनाथाची.- releasing soon. आजच्या ग्रामीण जीवनाचं ऊध्वस्तपण आणि माथी मारलेलं चाकरमानीपण ही कथा अधोरेखित करते. निसर्गरम्य गावांची संस्कृती, उत्सव, सण, परंपरा, जीवनमान, पर्यावरणाचे विहंगम भव्य दर्शन ते अट्टाहासाने आणि दडपशाहीने यंत्रणांनी हे सर्व ऊध्वस्त केल्यानंतरची भयाणता असा हा प्रवास आहे. गावागावात घरोघरी अध्यात्मिक वातावरणात येणारी देवाची पालखी, वार्षिक ऊत्सवात होणारी भावपूर्ण आरती, बैलांची झोंबी, नंदेश विठ्ठल उमप यांच पहाडी आवाजातलं कोकणाची भव्यता आणि निसर्गरम्यतेचं दर्शन घडवणारं थिम साँग, गाव ताब्यात घेण्यासाठी सरपंचाने कुटनितीने आणलेला अप्सरा कोल्हापूरकर चा तमाशा, गावक-यांच आंदोलन विस्थापन आणि शहरीकरणापर्यंतचा लादला गेलेला अस्वस्थ प्रवास निसर्गरम्य कोकणात आणि जगभरातील गावागावात विकासाची सोंगे घेऊन आलेले प्रकल्प, पर्यावरणाचा आणि निसर्गाचा होत चाललेला –ह्रास, गावे ताब्यात घेण्यासाठी सरपंच आणि यंत्रणांनी केलेली दडपशाही, दिशाभूल आणि अत्याचार-- आणि या सगळ्यातून आपला गाव वाचविण्यासाठी गुरूनाथ, नाना, मास्तर आणि गावकरी शेवटपर्यंत व्यवस्थेविरूद्ध लढत राहतात, अखेर नामोहरम होऊन त्यांना गाव सोडणे भाग पडते, उघड्या डोऴ्यांनी आपल्या गावांची पडझड पाहत रहावी लागते आणि पोटापाण्यासाठी शहराचा मार्ग धरावा लागतो.
Posted on: Mon, 17 Jun 2013 04:43:27 +0000

Trending Topics



o say about me

Recently Viewed Topics




© 2015