गोष्ट माझ्या आईची शंभर - TopicsExpress



          

गोष्ट माझ्या आईची शंभर रुपये कमवायला ती आठ आठ km पाई पाई जायची आज सांगतो गोष्ट मी माझ्या हिम्मतवान आईची माझ्या admission साठी तू convent मध्ये गेली होती donation ला पैसे नाही म्हणून अपमानित झाली होती"माझा मुलगा हुशार आहे कोणी तरी या सिस्टर ला सांगा"पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा दिवाळीत नवीन नसले तरी स्वच्छ कपडे घालायचे असे तू सांगितले. स्वाभिमानाने कसे जगायचे हे आम्हाला शिकवले चकली चिवडा आवडत नाही अस मी शेजारी सांगायचो. घरी आल्यावर आपण दोघही किती ग रडायचो कौलारू आपल्या घरात पाउस पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा table वर बसून खिन्न डोळे हसरा चेहरा कसा मी विसरायचा. राब राब राबून तू आम्हाला खूप मोठे केले सांग आता तुझे कुठले स्वप्न राहिल े तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आक ांक्षा आता मी पूर्ण करील नाही जर केले तर माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील
Posted on: Sat, 28 Sep 2013 18:18:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015