चिंचपोकळी,लालबाग, परेल - TopicsExpress



          

चिंचपोकळी,लालबाग, परेल परिसरात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत…. गणपती दर्शनाला येताना खालील खबरदारी घ्यावी, हि विनंती . १. लालबाग परिसरात सध्या वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे त्यामुळे येथे येताना शक्यतो स्वताच्या गाड्या आणू नका. (गाड्या पार्किंग साठी पुरेशी जागा उपलब्ध नाही) २. शक्यतो रेल्वे किवा बेस्ट बस ने यावे. जवळील रेल्वे स्टेशन १. चिंचपोकळी आणि करीरोड (मध्य रेल्वे) २. कॉटन ग्रीन (हार्बर रेल्वे ) ३. लोअर परळ (वेस्टर्न रेल्वे) (परिसरात जवळपास ६-७ BUS stops आहेत ) ३. येताना लहान मुलांच्या खिशात घराचा पत्ता आणि पालकांचा फोन क्र. नोंद करून ठेवावा. ४. महिलांनी कृपा करून अंगावर जास्त दागिने घालू नयेत. ५. संशयादस्पद वस्तू किंवा संशयादस्पद व्यक्तीची हालचाल किंवा काही अनुचित प्रकार आढळ्यास त्वरित पोलिसांकडे संपर्क साधावा. (प्रत्येक ठिकाणी आपले मुंबई पोलिस आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहेत) ६. आपली सुरक्षा आणि काळजी आपल्याच हाती. आपला नम्र, सिध्देश नाटेकर, चिंचपोकळी जय महाराष्ट्र
Posted on: Mon, 09 Sep 2013 03:46:19 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015