चेरेकरजी आणि फ़ेसबुकवर जे - TopicsExpress



          

चेरेकरजी आणि फ़ेसबुकवर जे असंख्य सावरकर भक्त आहेत, ज्यांनी आधीच्या माझ्या काही पोस्टस वर बहुमोल आणि आदरणीय (?) प्रतिक्रिया दिल्या आहेत. "विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही" त्या धरतीवर माझे मित्र चेरेकर सर आपला हट्ट कधीच सोडत नसतात. त्यांनी (व इतर काहींनी अन्यत्र) काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांना एकत्रीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. १. सावरकर मुस्लिमविरोधी नव्हते हे मत अमान्य. सावरकर गांधीप्रणित स्वातंत्य्र्य चळवळीच्या विरोधात असण्याचे मुख्य कारण सावरकरांचा मुस्लिम विरोध हे होते. सावरकरांना हिंदू (भारतात जन्मलेले सर्व धर्म) वगळता अन्य राष्ट्रांनी गौणत्वाने जगावे असे वाटत होते. २. सावरकरांच्या सैन्यभरती आवाहनाचा विपर्यास केला जात आहे. समजा त्याचे श्रेय सावरकरांना द्यायचे तर मग पहिल्या महायुद्धाबाबत ते गांधीजींनाही द्यायला हवे. सावरकरांनी इंग्रज सैन्यात भरती होणे म्हणजे सुभाषबाबुंना बळ मिळणे असे होत नव्हते कारण सुभाषबाबू इंग्रजांविरुद्ध लढत होते, त्यांच्या बाजुने नव्हे. सुभाषबाबुंना मिळाले अथवा मिळनार होते ते हरलेले युद्धकैदी, ज्यांना पोसण्याची जबाबदारी तशीही जर्मन-जपान्यांना घ्यायची नव्हती. एका अर्थाने सुभाषबाबू हे इष्टापत्ती होते त्यांच्यासाठी. कारण झाला तर त्यांचाच अधिक फायदा होता. ३. सावरकरांमुळे भारतीय सैन्य सबल झाले हा दावा केवळ सावरकरांवरील अतीव प्रेमापोटी पण गैरसमजातून आहे. आधी मुस्लिमांची संख्या सैन्यात अधिक होती (फाळणीपुर्व) हे खरे आहे...पण फाळणीनंतर ते प्रमाण आपोआप संतुलित झाले. सैन्यभरती फक्त हिंदुंचीच इंग्रज करणार असा नियम नव्हता. सावरकरांच्या आवाहनाने प्रेरीत होऊन मुस्लिम सैन्यात जानार नाहीत असे कोठे होते? खुद्द सुभाषबाबुंनाही आझाद हिंद सेनेत मुस्लिम सैन्य व हिंदू सैन्य असे दोन तुकडे करावेच लागले होते हे सोयिस्करपणे विसरुन चालणार नाही. ४. सावरकरांचे हिंदू संस्थानिक प्रकरण अक्षम्य आहे हे माझे मत कायम आहे. ५. सावरकर वृद्ध झाल्याने त्यांना जपान प्रवास झेपला नसता हे खरे नाही...सावरकर देशभर फिरत होते, संस्थानिकांच्व्ह्या बैठका आयोजित करत होते...हे काही त्यांच्या थकलेपणाचे लक्षण नव्हते. ६. तरीही प्रचंड सैन्य असलेल्या जर्मनी अथवा जपानला काही पिस्तुले, तेही २० एक वर्षांपुर्वी पाठवून दोन-तीन हत्या घडवून आनणा-या "प्रेरक" क्रांतिकारकास महत्व देण्याची शक्यता नव्हती. जेही कोणी इंग्रजविरोधात आहेत ते मित्र या नात्यने त्यांनी घोष अथवा सुभाषबाबुंना जवळ केले...यापलीकडे फारसे महत्व देता येत नाही. सुभाषबाबुंनी सावरकरांच्या सल्ल्याने देश सोडला वगैरे चूक आहे हे राकेश पाटील यांनी दाखवून दिले आहे त्यामुळे त्यावर लिहित नाही. ७. प्रकाश झावरे पाटील सरांनी लिहिल्याप्रमाणे सशस्त्र क्रांतीची प्रेरणा द्यायला कोणा देवपुरुषाचे गरज नसते. ती विद्रोही तरुणांची आंतरिक प्रेरणा असते. कृतीशील व्हायला त्यांना कोठलेही आदर्श पुरते. उदा. सावरकरांना म्यझिनीची प्रेरणा होती. आजही असंख्य तरुण चे गव्हेरा, हो चि मिन्ह यांनाही आपले आदर्श मानतात. माओवादी माओला मानतात. त्यामुळे सावरकर सर्व क्रांतिकारकांचे एकमात्र प्रेरक होते हा सिद्धांत ठिसूळ आहे. ८. गांधीजींच्या सैन्यसिद्धांतांना प्रत्यक्ष वास्तव आणी नैत्यिक परिप्रेक्षातून पहावे लागते. तेवढे विचारी फार कमी लोक आहेत. असो. टोळीवाल्यांवर हल्ला करायला गांधीजींनी परवानगी दिली होती व त्याबाबत प्यारेलाल यांनाही धक्का बसला होता हे त्यांनी नमूद करून ठेवले आहे. गांधीद्वेषापोटी गांधीजींवर सोपे आरोप करणे अंगलट येते हे माहित असुनही असे आरोप होतात...हे नवलाचे आहे. ९. क्रांतिकारकांसमोर स्वातंत्र्य होते कि सुडभावना होती? सारे कट आणि हत्या पाहिल्या तर लक्षात येते कि क्रांतिकारकांनी कोणत्या ना कोणत्या घटनेचा सूड म्हणुन हत्या केलेल्या आहेत. त्यात खरेच व्यापक राष्ट्रीय भावना असती तर त्यात सुसुत्रता आली असती. भगतसिंगांनी मर्सी पिटिशनवर शेवटपर्यंत सही केली नाही. सावरकरांनी त्याला तसे करायला का सांगितले नाही? त्यांने स्वत:ची सुटका जशी "दूरदर्शीपणे केली" असे सांगितले जाते तर मग भगतसिंगादिंना तो सल्ला द्यायला सावरकर का विसरले हा प्रश्न आहेच. १०. क्रांतिकारकांचे सर्वच प्रयत्न भावनेच्या आहारी जावून केलेले व स्थानिक पातळीवरचे दिसतात. यामुळे स्वातंत्र्य मिळाले असते हे दिवास्वप्न आहे हे त्यांच्याबाबत पुरेपुर आदर ठेवत म्हणावे लागते आणि गांधीजींचेही हेच मत होते. ११. सावरकरांना कठोर चिकित्सेच्या पिंज-यात आनण्याचे पातक सावरकरवाद्यांनी केले आहे. अतिउदात्तीकरण केले नसते तर ते अधिक पुजनीय राहिले असते. आज देशात भगतसिंग-राजगुरुंबद्दल जेवढा आदर आहे तेवढा देश पातळीवर सावरकरांचा नाही हे वास्तव समजावून घ्यावे लागनार आहे. १२. स्वातंत्र्य चळवळीच्या कालात हिंदू महासभा व रा. स्व. संघाची भुमिका ही चळवळीला मारक होती...तारक नव्हे हेही लक्षात घ्यावे लागते. उलट त्यांनी गांधीजींची हत्या घडवून आणत स्वतंत्र भारतातील पहिला खुनशी दहशतवाद घडवला याबाबत देश त्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोपींना कधीही क्षमा करनार नाही. त्याउलट समजा जीना अथवा माउंटब्यटनची हत्या केली असती तर ते समजण्यासारखे होते. एवढ्या भिषण दंगलीत महात्मा वेड्यासारखा कसलेही संरक्षण न घेता शांततेची आवाहने करत फिरत होता... पण त्यांना ठार मारायची दुर्बुद्धी एकाही दंगल पिडीत हिंदू/मुसलमान अथवा शिखाला झाली नाही पण ज्यांना दंगलीची कसलीही झळ पोचली नव्हती अशा मराठी कथित "वीरां"नी ते दु:ष्कर्म केले ते अनंत काळ निंदनीयच राहतील याबाबत शंका बाळगू नये. १३. सावरकरांना मी काही शेलकी विशेषणे बहाल केली आहेत. खरे तर तो माझा स्वभाव नाही. पण त्यापेक्षा सौम्य शब्द मी वापरू शकत नव्हतो याचीही नोंद घेण्यात यावी. त्याला कोणी जबाबदार असतील तर अतिरंजित सावरकर रंगवणारे सावरकरवादी आहेत. १४. सावरकर विरोध आणि ब्राह्मण या दोन स्वतंत्र बाबी आहेत. सावरकर विरोध म्हणजे ब्राह्मण विरोध असे जे समजतात त्यांनी आपली डोकी अवश्य तपासून घ्यावीत. असो. मला जे म्हनायचे आहे ते पुरेसे सुस्पष्ट आहे. याउप्पर ज्यांना सावरकर-महिमान गायचे आहे त्यांनी खुशाल गांवे, आनंदोन्मादात नाचावे...काही म्हणणे नाही. पण एकच नमूद करतो...येथे आणि जगभर जे गांधीजींचे गौरवगान गातात त्यात त्यांच्या जातीचे-धर्माचे नसलेले अनंत आहेत. या संस्थळी या चर्चेत तर एकही नाही...पण सावरकरांची बाजू घेत जाणारे त्यांच्याच जातीतील असावेत याला मी योगायोग मानत नाही. धन्यवाद.
Posted on: Tue, 30 Jul 2013 12:04:20 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015