जिकडे देवापेक्षा - TopicsExpress



          

जिकडे देवापेक्षा मंडळाचे कार्यकर्ते मोठे होतात . . . . लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांवर मंडळाच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या धक्का बुक्कीचा विडीयो बघितला.हे दरवर्षीच आहे, ह्यावर्षी फक्त ते जनतेसमोर आल . अमुक अमुक राजा नवसाला पावतो म्हणून तासंतास रांगेत उभ्या असणाऱ्या भक्तांना अश्या प्रकारची वागणूक देउन नक्की काय सध्या होणार आहे ??? जास्तीत जास्त भक्तांनी दर्शन घ्यायचे आन मिडिया मध्ये गर्दीचा नवा उच्चांक गाठला म्हणून जाहीर करायचे एवढेच ! गणरायाने कधी सांगितलं नाही कि मला दरवर्षी नवे उच्चांक हवेयत . हि गत आहे नवसाच्या रांगेची . . . . मुख दर्शनाच्या रांगेतील भक्तांना गणरायाचे मुख दिसते किंवा नाही ह्याची काहीच कल्पना नाही . दुरूनच गर्दीतून फुल आणि हार फेकले जातात . . . ते मूर्तीपर्यंत पोहोचतात का ??? कि आपल्याच पायाखाली चिरडले जातात ??? कितीही उच्चांक गाठले तरी शिस्त आणि नियोजनात मात्र आपण नेहमी पाठीच राहतो !!!
Posted on: Fri, 13 Sep 2013 19:28:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015