ती : "मस्त ना? पाउस म्हणजे - TopicsExpress



          

ती : "मस्त ना? पाउस म्हणजे थंड वारा..." तो : "नाही गं पाउस म्हणजे चिखल सारा..." ती : "गप रे.... पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..." ... तो : "अगं पाउस म्हणजे.. ट्रेनचे वांदे आणि ऑटो रिक्षाचं भाडं...." ती :"सुधारणार नाहीस तू पाउस म्हणजे वेडी सर....." तो : "हा हा... पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची भर...." ती : "पाउस म्हणजे भिजलेल्या मातीचा गंध..." तो : "हा हा मातीचा गंध, पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे, पण office नाही बंद.." शेवटी ती : "किती bore आहेस रे तू? जा मला नाही बोलायचं तुझ्याशी." हे ऐकून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले, ती गालातल्या गालात सुंदर लाजली अन त्याला बिलगली. तो म्हणालेला : "हे बघ, तुझ्यासाठी पाउस म्हणजे जे असेल ते असेल, पण माझ्यासाठी "तुच माझी सर, अन् तूच माझा पाउस, फक्त मला कधीहि सोडून नको जाउस..
Posted on: Wed, 19 Jun 2013 16:42:32 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015