तुमच्या नसण्याने राजे - TopicsExpress



          

तुमच्या नसण्याने राजे !! स्वार्थाच्या माणसांनी , माणुसकीपण हरवलंय चरित्र स्त्रीचं तीनच , विकायला ठेवलंय निष्ठेला विकून लोकांनी, लबाडीन मन भरवलंय तुमच्या नसण्याने राजे.... खुप काही हरवलंय..... पैशाच्या बळावर श्रीमंतांनी , गरिबांना वाकवलय जन्मणाऱ्या प्रत्येक पीढीला , त्यांनी खोटेपण शिकवलंय अंतःकरणातला देव विसरून , त्याला मंदिरात बसवलंय तुमच्या नसण्याने राजे.... खुप काही हरवलंय..... सत्तेच्या मोहासाठी पुढारयाणी , जातीच साम्राज्य टीकवलंय स्वतः निचपनाचा पुतळा होऊन , नियतीला लाजवलंय घात केलाय स्वतःच्या इमानीचा , अन ईतिहासालाचं रडवलंय तुमच्या नसण्याने राजे.... खरंच खुप काही हरवलंय !!
Posted on: Thu, 25 Jul 2013 03:53:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015