नितीन दुते २००६ सालची हि - TopicsExpress



          

नितीन दुते २००६ सालची हि घटना आहे.मी माझा मित्र विकास च्या गावाला(नगर मध्ये,मावेशी गाव)गेलो होतो. मी,विकास आणि त्याची आई. विकासच्या गावाला जायचा कारण हे होतं की विकासच्या आजी आजोबांना रात्री घरावर कुणीतरी नाचतंय आन दरवाजा वाजवतंय आसं जाणवत होतं आस विकासनी मला सांगितलं.विकासचा एक चुलता पण होता पण त्याच्या बायकोचं आणि विकासच्या आजीचं पटत नव्हत म्हणून ते वेगळे झाले आणि आजी आजोबांनी त्यांच्याशी नातं तोडल्यामुळे त्यांनी हि गोष्ट विकासच्या बाबांनाच सांगणं ठीक समजलं. पण विकासचे बाबा कामामुळे नाही येऊ शकले आणि त्याच्या भावानी पण गावाला नाही जमत म्हणून येण्याचे टाळले…मला हि गोष्ट ऐकून जास्त आश्चर्य नाही वाटत की रात्री त्यांच्या घरावर काहीतरी असल्याचा आन दरवाजा वाजवल्याचा भास त्यांना होतो…त्यांच्या गावाला गेल्यावर मला कळले की त्यांचं घर हे गावापासून लांब म्हणजे शेताकडे आहे आन आसपास एकही घर वा वस्ती नाहीये. त्या रात्री आम्ही ८ वाजे पर्यंत जेवलो ९ वाजे पर्यंत सगळे झोपायच्या तयारीला लागले. पण विकासनी एक कुऱ्हाड जवळ ठेवली होती आणि विकासच्या आईच्या मते हे आजी आजोबांना होणारे भास असावेत त्यामुळे ती जास्त विचार करत नव्हती.पन जेव्हा रात्री १ वाजता अचानक घरावर कौलं वाजायला लागली तेव्हा आम्ही जागे झालो कुणीतरी घरावर चालत होतं.असं ५ मिनिट चालू होतं आन अचानक हे बंद झालं पण दुसऱ्या क्षणाला दरवाजावर थापा पडू लागल्या आन दरवाजा जोरजोरात वाजू लागला. विकासनी कुऱ्हाड हातात घेतली,त्याची आई जोरजोरात ओरडू लागली.मी दरवाजाकडे जाऊ लागलो,एक्चुअलि मी सगळ्यात जास्त घाबरलो पण विकास खूप धीट होता तो जोरात ओरडला की कोण आहे रे बाहेर आन मला बोलला दरवाजा उघडू नकोस.दरवाजा पासून लांब हो. थोड्या वेळात सगळं थांबलं.आता दरवाजा वाजण बंद झालं.पण विकास बोलला दरवाजा उघडायचा नाही आन आम्ही सकाळ होण्याची वाट पाहू लागलो.त्या रात्री भीतीने कोणाला झोप आलीच नाही.सकाळी आम्ही दरवाजा उघडला बाहेर उजेड बघून बरं वाटलं.आम्ही आसं ठरवलं की कोणीतरी चोर आसवे आणि हे एकांतातले घर बघून त्यांना चोरी करायची असावी आन विकासनी आवाज काढल्यावर घाबरून त्यांनी दरवाजा वाजवणं बंद केलं आसव. दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच एका झाडावर एक जागा बनवली थोडी उंचावर लपण्यासाठी तिथे आम्ही कुऱ्हाड आन फावडे नेउन ठेवले आम्ही गावात जाऊन टॉर्च घेतला आन माहित नाही कुठून विकासनी एक फटाक्याची माळ आणली की काही वाटलं तर फटाक्याची माळ लाऊन आवाज करून जो दरवाजा वाजवतोय त्याला घाबरवायचा. आम्ही हा प्रकार गावात हि कोणाला नाही सांगितला आन विकासच्या चुलत्याकडे जाऊन आलो त्यालाही सांगणं योग्य नाही वाटलं. रात्रीची गोष्ट आजूनही आम्ही सिरिअस्लि घेतली नव्हती. आम्ही संध्याकाळ होताच जेऊन घेतले आणि ७ च्या सुमारास झाडावर जाऊन बसलो. कारण गावाला रात्र लवकर होते. विकासनी त्याच्या आईला सांगून ठेवले कि काही झाले तरी दरवाजा उघडू नकोस आणि घाबरू नकोस. आतून काडीला टाळं लाव. त्यांनी सांगितल्या प्रमाणे केले. आता आम्ही कालच्या वेळेची वाट पाहत होतो. मला चुकून झोप लागून गेली. अचानक कालच्या वेळेला विकासनी मला उठवलं.तो घाबरलेला होता तो बोलला घराकडे बघ मी पाहिलं तर घरावर कौल हलत होते पण कुणीच दिसत नव्हते. आम्ही टॉर्च मारून पाहायला लागलो पण कोणीच दिसत नव्हते. अचानक ते बंद झालं आणि दरवाजा वाजू लागला. आम्ही दोघे हे सर्व पाहत होतो पण दरवाजा खूप जोरात वाजत होता. आम्हाला आता काय करावे सुचत नव्हते आणि अचानक नाही तेच झाले विकासच्या आईनी दरवाजा उघडला आम्ही शॉक झालो आन अचानक विकासच्या आईला कोणीतरी धक्का मारला. आम्ही आता झाडावरून पटापट उतरायला लागलो. आन घरत घुसलो. मावशी(विकासची आई) एका कोपर्यात गप बसल्या होत्या. घाबरून आम्ही आता जाताच इकडे तिकडे नजर फिरवली आणि पहिले विकासच्या आईकडे गेलो तिने एका कोपर्याकडे बोट दाखवले तिथे विकास ची आजी पडलेली होती. पण ती आता नव्हती राहिली. ती मेली होतीऽअम्हल धक्काच बसला विकासचे आजोबाही एका जागी बसून गप्पं पाहत होते.ते ठीक होते पण गप्प झालेले. आता आम्ही विकासच्या आईकडे वळलो. विकासनी विचारलं तुला सांगितला होतं दरवाजा उघडू नकोस तरी का उघडलास. तेव्हा ती बोलली त्यावर विश्वास नव्हता बसत. मावशी बोलल्या कि दरवाजा वाजत होता तेव्हा विकास आवाज देत होता कि आई दार उघड पटकन. आणि मी घाबरून जाऊन दार उघडलं पण बाहेर कोणी नव्हतं. पण अचानक मला धक्का दिला कोणीतरी मी खाली पडले,पण समोर कोण नव्त. अचानक आजी जोरजोरात ओरडू लागल्या आन कोणाकडे तरी बोट करून बोलू लागल्या कि माझ्या कडे येऊ नकोस आणि जोरात ओरडून त्यांनी दम तोडला. पण ती कोणाकडे तरी बोट करत होती. तिच्याकडे कोणीतरी येत होतं. हे आईकून आम्हाला तर वेड लागेल आसं झालं. आता आम्ही विकास च्या बाबांना आणि त्याच्या काकांना फोन केला. १५ मिनिटात विकास चा काका (चुलता) काही लोकांना घेऊन आला. विकासची चुलती पण होति. थोड्या वेळात रडारड सुरु झाली. सकाळी ९ पर्यंत विकासचे बाबा आणि त्यांचे भाऊ पण मुंबई वरून आले. विकासच्या बाबांनी आणि काकांनी हि घडलेली गोष्ट जास्त कोणाजवळ बोलू नका असं सांगितलं. सगळा विधी झाला आणि अग्नी दिला गेल्यानंतर जेव्हा घरातल्या लोकांसमोर हा विषय निघाला तेव्हा सगळ्यांनी आम्हाला मुर्खात काढलं. आम्ही शहाणपणा करून झाडावर निगराणी करायला गेलेलो आसे बोललो. विकासचे काका हि खूप ओरडले कि माल सांगता येत नव्हतं का काल जेव्हा घरी आलेलात तेव्हा काय झालेलं रात्री ते. शेवटी ते घर बंद केले आणि विकास च्या आजोबांना विकासच्या घरचे मुंबई ला घेऊन आले. पण तशी घटना का घडली या मागे काय रहस्य होते ते कळले नाही. पण एक रहस्य आम्हाला कळले. काही दिवसांनी ते मी तुम्हा सर्व मित्रांना माझ्या पुढच्या स्टोरीत सांगेन.
Posted on: Tue, 01 Oct 2013 17:57:57 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015