परमपूज्य सद्‍गुरु श्री - TopicsExpress



          

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०१.०८.२०१३) ॥ हरि ॐ ॥ रामनाम Bank अहवाल : अकाउंट १ लाख ६९ हजार, राम नाम जप ३२ अब्ज, एकूण जपसंख्या : ४९ अब्ज,२९ कोटी,२४लाख,२५ह्जार अंजनामाता वही जपसंख्या : २४कोटी,५५लाख आज आपण आधी मागच्या वेळेस ज्याबद्दल बोललो ते बघायचे आहे. π = २२/७ हे आपण बघितले. कुठल्याही circle चा circumference / diameter हा ratio नेहमी कायम (constant) असतो. π ही एक जबरदस्त शक्ती आहे. हा π भारतीय संस्कृतीत त्रिविक्रमामध्ये चिन्हांकीत केलेला आहे. आज आपल्याला बघायचे आहे हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आपल्या जीवनात काम कसे करते. ही एक विराट चेतना आहे. ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छ करू शके। आपण ब्रह्माण्ड शब्द ऐकतो. हे circle आहे. दुसरा शब्द कालचक्र, हे पण circle आहे. तिकडेपण हा π काम करतो. मनुष्याच्या शरीरात वर्तुळाकार असलेली गोष्ट कोणती? डोळ्यातील बाहुली (iris) ही Circular आहे. ज्याने आपण जगाला बघतो, ऒळखतो, देवाचे दर्शन घेतो तो दरवाजा वर्तुळाकार आहे. त्यामधील जी बाहुली (pupil) पण Circular आहे ही प्रकाशानुसार adjust होत असते. म्हणजेच प्रकाश आत घेणारी संस्था Circular आहे. म्हणजेच हे सर्व π च्या वर्चस्वाखाली आहे. इथे प्रभाव, सत्ता आहे त्रिविक्रमाची. शरीरातील दुसरी वर्तुळाकार असलेली गोष्ट - नाभी (umbilicus) देखील Circular आहे. ही नाभी आईशी जोडलेली असते. हे विश्व आदिमातेने निर्माण केले. हे सर्व ब्रह्माण्ड आदिमातेमध्येच आहे. या आदिमातेच्या गर्भाशयातून कुणीही कधीही बाहेर पडू शकत नाही. काही झालं तरीही मी तिच्या गर्भातच राहतो, हा विश्वास पाहिजे. आम्हाला माहिती पाहिजे कितीही मोठे संकट असले तरीही आम्ही तिच्या गर्भातच राहतो. वाईट माणूसपण तिच्या गर्भातच राहतो. आदिमातेकडून येणारी नाळ म्हणजे आईचं प्रेम म्हणजे वात्सल्य, म्हणजेच तिची कृपा. बाळाकडून म्हणजेच प्रत्येक मनुष्याकडुन त्या placenta through जाणारी रक्तवाहिनी गोष्ट म्हणजे श्रद्धा व विश्वास. ती सदैव कृपा करण्यासाठी आतुर असते पण प्रत्येकाला कर्मस्वातंत्र्य आहे. जर बाळाने नाळ कापायची ठरवलं तर तिची कृपा आम्हाला कशी मिळणार? माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते ह्याचा अर्थ कळला का राजांनो? म्हणजेच श्रद्धा व सबुरी कापली तर कृपाही नाही मिळणार. आपणच कात्री घेऊन कापत असतो म्हणून तिची कृपा आपल्याला मिळत नाही. ज्या प्रमाणात श्रद्धा त्या प्रमाणात कृपा. तुमच्याशी शत्रुत्व घेणारा मनुष्य, जर त्याची श्रद्धा जास्त असेल तर त्याच्यावर कृपा जास्त. श्रद्धा आणि विश्वास ही सख्खी भावंडं आहेत. आम्ही भगवंताची प्रार्थना करताना कायम रडगाणी गातो. तुम्ही तुमचा विश्वास व्यक्त करता जेव्हा तुम्ही तिची स्तुती करता. हेमाडपंत ठायी ठायी विश्वास व्यक्त करतात. आमच्याकडे तेवढा विश्वास आहे का? मग कृपा मिळणार कशी? जीवात्म्याला आदिमातेशी जोडणारी जी रचना आहे, ती रचना म्हणजे सद्‌गुरुतत्त्व. देव कोपतां गुरू तारी, गुरू कोपतां कोण ? पण तो कधी कोपतच नाही कारण ती "क्षमा" आहे. तिच्या अकरा मुळ नावांमधील एक नाव "क्षमा" आहे हे लक्षात ठेवा. आम्ही कितीही वेळा नाळ कापली तरी ती आई लेकाला सांगते, बाबारे जोड. हजारवेळा तो परमात्मा ही नाळ जोडत असतो. हे जोडण्यासाठीचे सामर्थ्य म्हणजे π. मनुष्याच्या हृदयातही चार कप्पे आहेत. right atrium मधले अशुद्ध रक्त right ventricle मध्ये जाते तिथून ते रक्त pulmonary artery मधुन फुफ्फुसाकडे जाते तेथून pulmonary vein through aorta मधून सर्व शरीरात पसरते. शुद्ध रक्त heart मधून सर्व शरीरात पसरतं व शरीरातील अशुद्ध रक्त पुन्हा heart मध्ये येतं. हे चक्र आहे. चक्राचा energy force हा circular आहे. आपण किती वेळा हा विश्वास तोडतो. देव बघत नाही असं कधीच होत नाही. आईला सगळं समजतं. ही जी नाळ आम्ही कापून टाकतो ती जोडण्याचे सामर्थ्य या π ह्या त्रिविक्रमामध्येच आहे. त्यामुळे आपण पापी असो वा पुण्यवान तिच्या गर्भातच असतो. तिला कळत नाही असं काहीच नाही. लहान बाळ आईने झोडले तरी आईने परत जवळ घेतल्यावरच शांत होते मग हे आम्ही पुढे मोठे झाल्यावर का विसरतो? आपण frustration नैराश्यात जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा नाळ तुटत नाही पण जेव्हा रागाने मनुष्य स्वत:च्या बुद्धीचा वापर करून असं म्हणतो की हा देव माझ्यासाठी काही करत नाही तेव्हा ही नाळ तुटायला लागते. रक्तवाहिनी कशी आहे? circular आहे. तिचा प्रवाह पण या π या त्रिविक्रमाच्या under आहे. म्हणून आपण आपल्या बाजूने ही नाळ तोडता कामा नये. तुमचं मन एवढं strong नाही की एकदा नाम घेऊन चालत नाही. यासाठी रोज आम्हाला विश्वास उच्चारावा लागतो "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते" हा माझा पूर्ण विश्वास असणे आवश्यक. हे वाक्य आपण सतत लक्षात ठेवायला हवं. पाठीशी असतां साईसमर्थ, कोणी न शकें लावू हात. हा झाला विश्वास. मग श्रद्धा काय? श्रद्धा म्हणजे प्रेम. नुसतं प्रेम नाही तर हा असाच आहे ह्या भावनेने केलेलं प्रेम. आम्ही कितीही चुकलो तरीही हा आम्हाला कधीच टाकणार नाही ही भावना म्हणजेच श्रद्धा. हा माझा आहे हे प्रेम, आपलेपणा म्हणजे श्रद्धा. यासाठी कधी देवाकडे देवाच्या चेहर्‍याकडे, चरणांकडे बघायला पाहिजे. हा विठ्ठल माझ्यासाठी २८ युगे उभा आहे. आम्हाला कधी वाटतं का ह्याचे पाय दाबावेत. आम्हाला समजलं पाहिजे हा किती कष्ट घेतो, हाच आपल्यावर प्रेम करतो. ह्या आदिमातेचं वात्सल्य माझ्यावर आहेच या विश्वासातून निर्माण होते आपुलकी आणि आपुलकीतून निर्माण होतो विश्वास. आपुलकी म्हणजेच श्रद्धा. आपलेपणा आपल्याला जपावा लागतो. गुरूक्षेत्रममध्ये ती शस्त्रसज्ज उभी आहे. कोणासाठी? माझ्यासाठी. ह्याच तिच्या नात्यातून निर्माण होतो ’श्री श्वासम्‌’ (तिच्या गर्भनाडीच्या प्रक्रियेतून). तीच सत्ता चालवते. हा π आपल्या जीवनात नीट रहायला पाहिजे. आम्ही काय करतो? circle सुरू केले की एकतर बाहेर जातो किंवा आत जातो. हे असे circle म्हणजे जे देवाने दिले त्याबद्दल आभार न मानता पुढच्याची अपेक्षा करतो. त्यामुळे आमचे circle पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला π चा सिद्धांत लागूच होत नाही. आषाढी एकादशीला आम्ही उपवास करतो. उपवास म्हणजे काय त्याचे नाव ऐकणे, भजन करणे, आम्हाला वाटले पाहिजे त्याचे पाय चेपले पाहिजेत. हे पादसंवाहन आहे. आपल्या पाठीच्या मणक्यातील disc ही circular असते. ह्या मणक्यामधुन सुषुम्ना नाडीचा, अंजना मातेच्या प्रभावाचा प्रवास, महाप्राणाचा संचार त्या disc च्या आश्रयाने होतो. कोणासमोर वाकायचे नाही, वाकायचे ते फक्त भगवंतासमोर हा ताठ कण्याचा बाणा फक्त हा π देऊ शकतो. शरीरातील पेशी या ९०% गोलाकारच आहेत. या पेशींतील nucleus हे circular असते. पेशींचे केंद्र म्हणजे पेशींचा brain हादेखील circular आहे. त्यानंतर DNA आपण पाहतो. ह्यांच्या genes मधुन genes जनुके बनतात. आईवडीलांकडून जे गुण बाळांकडे येतात ते genes through येतात. ह्या DNA मधल्या एका भागाचा दुसर्‍या भागाशी असणारा संबंध हा circular आहे. ह्यावरून आपल्याला कळेल आमच्या शरीरात ह्या π ची action, प्रभाव किती जोरदार आहे. पौर्णिमेचा चंद्र, सूर्य, पृथ्वी, पाण्याचा थेंब हे सारे गोलच आहेत. शनीचा त्रास होऊ नये म्हणून या ग्रहाभोवती त्रिविक्रमाने तीन कडी घातली आहेत. फक्त उपद्रवी ग्रहालाच त्याने कडी घालून आवळून ठेवले आहे. ही परमेश्वरी रचना आम्हाला समजली पाहिजे. असा हा π त्रिविक्रम आणि त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हात आहे. ही खरी सत्ता आहे. त्या आदिमातेने त्रिविक्रमाला मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न केला, आमच्यासाठी पाठवला आहे. आम्हाला उपनिषदातून कळले पाहिजे, मी विगत असलो तरी तो परमात्मा माझ्यावर कृपा करण्यास आतुर आहे. उत्तम, मध्यम पहिल्यापासून आहे पण विगत मध्येच येतो. कारण तो खूप weak आहे. तो अख्खी यात्रा चालू शकणार नाही. म्हणून आम्ही कितीही पापी असलो तरीही आपल्याला टाकत नाही. आईचे वचन आहे, जे जे सर्व मध्यम, उत्तम, विगताला मिळाले ते ते सर्व उपनिषद वाचणार्‍याला मिळणार आहे. आणि हे करणारी संस्था म्हणजे π. ह्यासाठी आपल्याकडून ही नाळ तोडली जाणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. हा मला कधीच टाकणार नाही व आईचे वचन "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते" ह्या विश्वासाचा रोज उच्चार करा. आम्ही कितीही विषादात असलो तरीही हा विश्वास व्यक्त करा मग बघा गोष्टी कशा आपोआप बदलतील. आम्ही आईच्या गर्भात आहोत तिथे त्या π चे साम्राज्य आहे. म्हणूनच हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आमच्या गळ्यात, मनात, बुद्धीत, हृदयात असले पाहिजे. माझी स्मरणशक्ती कमी असली तरी माझ्या सद्गुरूची नाही. ह्या π ची शक्ती आपण बघितली. उपनिषद म्हणजे काय? माझ्या जीवनातल्या क्रिया प्रक्रिया आहेत. हा π बघितल्यावर जाणवेल की उपनिषद म्हणजे माझे जीवन आहे. हा त्रिविक्रम असा चण्डिकापुत्र, त्याच्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर तो हजारो पटीने प्रेम करतो. "त्रिविक्रम हा माझ्या जीवनाचा एकमेव संपूर्ण आधार आहे". ॥ हरि ॐ॥ Welcome to Manasamarthyadata
Posted on: Mon, 05 Aug 2013 11:10:45 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015