.परवा भेटला बाप्पा, जरा - TopicsExpress



          

.परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला. “दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.*."उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला". मी म्हटले"सोडून दे, आराम करू दे त्याला".*."तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?.मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".*."मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक. तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.*."इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो. भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".*."काय करू आता माझ्याने manage होत नाही. पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत".*."immigration च्या requests ने system झालीये hang. तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग".*."चार-आठ आणे देऊन काय काय मागतात. माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात".*."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation. management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".*."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?. Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".*."असं कर बाप्पा एक Call Center टाक. तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक".*."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको. परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको".*.माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झालa. "एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला".*."CEO ची position, Townhouse ची ownership. immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".*.मी हसलो उगाच,"म्हटलं खरंच देशील का सांग.?". अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग.?.*."पारिजातकाच्यa सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं. सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"*."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव. प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव".*."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?. नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".*."इंग्रजाळलेल् या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं. आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं.?".*."कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर. भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार".*."यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान. देशील का रे देवा, यातलं एक तरी दान.?".*."तथास्तु"म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा,"सुखी रहा"म्हणाला. . . . .
Posted on: Thu, 12 Sep 2013 05:35:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015