पुढे बघुन जात असलेल्या - TopicsExpress



          

पुढे बघुन जात असलेल्या अनघाला माघुन कोणीतरी हाक मारत असतं..अनघा मागे वळुन पाहते एक मुलगा धावत धावत येतो. मुलगाःहाय अनघाःकोण? मुलगाःमी प्रतिक अनघाःमाझ्याकडे काय काम आहे?काय मी तुला ओळखते? प्रतिकःनाही,तु मला नाही ओळखत पण मी तुला ओळखतो तुझं नाव अनघा आहे,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तु खुप सुंदर आहेस,मला तुझ्याशीखुप दिवसापासुन मैत्री करायची इच्छा होती,माझ्याशी frndshp करशील. तीःमी अनोळखी मुलांशी मैत्री नाही करत। अनघाःअनोळखी मुलांशी मैत्री करायला घाबरतेसका,की अनोळखी कोणीतरी तुझ्याहृदयात नकळत येऊन राहील याला घाबरतेस? अनघाःबोलतोस तर छान,चल मी तुला देते एक चान्स.आजपासुन तु आणि मी मित्र आहोत ok खुश.by प्रतिकःअगं पण तुझा मोबा.नं,पत्ता वगैरे काहीसांग ना? अनघाःमैत्री केलीयस ना मग शोधुन काढ ना प्रतिकःooooook एक दिवस संध्याकाळच्या वेळी ती जेव्हा स्टडीकरत असते,तिचा फोन वाजतो,ती फोन उचलते, "देखके एक दिन एक लडकी को प्यार उसपे बेशुमार आया,एकबार आवाज सुनली उनकी,हाय।मेरे दिलको करार आया"hi हेलो कोन?,...तुझ्या मागच्या जन्मीचा प्रेमी प्रतिक... प्रतिक तु तुला हा नंबर कसा मिळाला? "केह दो तो आसमान भी चुनलू,कह दे तो तारे भी गिनलु,नंबर क्या चीज हे मेर दोस्त,तेरे लिये तो मे हवा को समंदर मे बुनलु" अनघा हसुन म्हणाली,शायरी छान करतोस.बर बोल काय म्हणतोस?काय पाहीजे तुला? "ये दिल प्यासा हे आपके मिलने का,दिलको बस इसीसे राहत है.एक मुलाकात की ख्वाईश है,इसकी बस यही चाहत है" अनघा प्रतिकच्या बोलण्यावर खुपच भाळते,त्याला ती भेटण्यासाठी वेळ देते.त्यांची भेट होते.या भेटीमध्ये अनघा प्रतिककडे खुपच attract होते,त्याची बोलण्याची पद्धत,त्याचाआवाज त्याची स्टाईल आणि मुळ म्हणजे त्याचं तिच्यावर खुप जीव लावणं हे खुपच भावुन टाकणारं असतं.त्याची एकच गोष्ट तिला खुपच खटकत असते ती म्हणजेत्याचं खुपच exprressive असणं.एखाद्याविषयी मनात प्रेम आलं तर तो लगेच बोलुन दाखवतो,राग आला तरी बोलुन दाखवतो,त्यामुळेते इतरांना खुपच विचित्र वाटायचं. एक दिवस प्रतिक अनघाला थोडं वेगळ्या प्रकारेप्रपोज करायचं ठरवतो.तो एक गुलाबाचं फुल घेऊन येतो.आणि तिचं कॉलेज सुटल्यावर ती बरोबर गेटबाहेर आल्यावर तो दोन्ही गुडघ्यावर बसुन तिला i love u म्हणतो.पण सर्वाँसमोर अचानक घडलेल्या या प्रकाराने अनघा बिथरते.व थोडा वेळ विचार करत तशीच उभी राहते...प्रतिकला याच गोष्टी गैरसमज होतो,प्रतिक म्हणतो,ठीक आहे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये ना?तर मग माझ्या जगण्याला काय अर्थ असं म्हणुन,वाहने धावणार्या रस्त्यावर तो मागे मागे जाऊ लागते,वेगात असणारीवाहने त्याला चुकवुन जाऊ लागतात,पण तरीही अनघाकडे बघत तो मागेमागे जात असतो.विचारातुन बाहेर येऊन जेव्हा ती प्रतिककडे,भर रस्त्यातुन मागे मागे जाताना पाहते,तेव्हा ती जोरात ओरडते i love u pratik. तेवढ्यात जोराच्या येणार्या वार्याने अनघाच्या बेडरुमच्या खिडक्या उघडुन हार चढवला गेलेला प्रतिकचा फोटो धाडकन खाली पडतोअन अनघा भानावर येते,तिच्या डोळ्याच्यापापण्यांमध्ये पाणी साचलेलं असतं.पापणी झाकताच ते पाणी तिच्या गालावरुन घरंगळत तिच्या गळ्यापर्यँत येतं..,. ताईसाहेब ताईसाहेब चला आपल्याला कोर्टात जायचंय ना,वेळ होतोय.अनघाच्या घरातली मोलकरीन तिलाहाक मारत असते.नंतर ती कोर्टात जाते. वकीलःतर अनघा तु या गुन्ह्यातील एक साक्षीदार आहेस,बोल या पाचजणांनीच प्रतिकचा खुन केला?आणि कसा केला? अनघाःप्रतिक आणि मी एकमेकांवर खुप प्रेम करायचो.प्रतिक मला कायम सांगायचा की आमच्या कॉलेजमध्ये खुप मोठ्या प्रमाणावर रॅगिंग होतं आणि खुपवेळा मीही त्याचा बळी पडलोय.तो याच समोर उभ्या असलेल्या पाचजणांची नावे कायम घ्यायचा आणि खुपवेळा एकदम शांत व्हायचा.मी त्याला खुपवेळा सल्ला दिला की आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करुया पणतो कायम नाही म्हणायचा.... एक दिवस त्याचा मला फोन आला होता,त्याचा आवाजखुपच थरथरत होता,तो सरळ काहि बोलत नव्हता.पुन्हा पुन्हा या पाचजणांची नावे सांगत होता हे मलाजगु देत नाहीयेत असं तो म्हणत होता.म्हणुन मी तडख बॉईज होस्टेलकडे निघाले जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्याने फास लावुन घेतला होता,पोलीसांच्या प्राथमिकअंदाजातच कळलं की प्रतिकचा खुन झालाय.यांच्या रॅगिँगचा शिकार झालेल्या इतर विद्यार्थ्याँपैकी तिघांनी यांनी प्रतिकचाप्रत्यक्ष खुन करताना पाहीलं होतं.मी त्यांच्या सहाय्यानेच यांच्यावर केस दाखल केली आणि त्यांनीही यांच्याविरुद्ध साक्ष दिलीय,त्यानंतर काय झालंय ते तुमच्यासमोर आहे.... अनघा आणि इतर साक्षीदारांच्यासाक्षीने न्यायालयाने या पाचजणांना 14वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अनघाच्या त्यागाला आज रंग आला होता.ती समाधानाने घरी गेली.तिच्या बेडरुममध्ये प्रतिकचा तो खाली पडलेला फोटो तसाच होता.तो तिने उचलला.त्याच्यावर पडलेली धुळ तिने स्वतःच्या ओढणीने पुसले.तिच्याडोळ्यातला एक अश्रु त्या फोटोवर पडत होत.ती म्हणाली,तुला माहीतीये प्रतिक माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण कोणता,जेव्हा तु गुडघ्यावर उभं राहुन सर्व कॉलेजसमोरमला ilove u म्हणालास.आणि त्यानंतर मी थोडा वेळ घेतला खरा पण मी ही i love u म्हणाल्यावर जेव्हा तु मला मिठीत घेतलंस तोच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता.अन दुःखीक्षण,तुझ्या मृत्युचा क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट सर्वात दुःखी होता.पण मी आज त्याच मृत्युला सार्थक बनवलंय आणि त्या सर्वांना शिक्षा दिलीय.आज तुझ्या आत्म्याला शांती नक्की मिळेल.........,
Posted on: Thu, 18 Jul 2013 04:39:49 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015