पुण्याच्या ऍग्रोवन कृषी - TopicsExpress



          

पुण्याच्या ऍग्रोवन कृषी प्रदर्शनाला चांदवडच्या शेतकऱ्यांची भेट चांदवड : अखिल चांदवड तालुका सामाजिक कार्यकर्ते बापूकाका आहेर कृषी मंचाच्या शेतकऱ्यांनी पुण्यातील ऍग्रोवन कृषी प्रदर्शनाला भेट दिली यावेळी शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञानाची खरेदी व आगाऊ नोंदणी केली. तंत्रज्ञान आदान प्रदानाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मोठी संधी मिळाली. विशेषतः विविध परिसंवादांना शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती नोंदविली होती . या प्रदर्शनामुळे शेतकरी व बॅंका, पतपुरवठा संस्थांमधील दरी दूर होण्यास मदत झाली तसेच शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी सवलतीचा दर मिळाला. यावेळी शेतकऱ्यांनी ठिबक संचांची मागणी नोंदवली. प्रदर्शनात इस्राईल, इटली, तैवान आदी देशांसह राज्य व देशभरातील प्रमुख कृषीविषयक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कंपन्यांबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी संशोधन व शेतकरी लघुउद्योजकांनाही या प्रदर्शनाने विकासाची नवी दालने खुली केली.या प्रदर्शनामुळे शेतीशी संबंधित व्यवसाय, उद्योजकता विकासाला चालना मिळाली. या भेटीत ,सचिन आहेर, योगेश गांगुर्डे आणि इतर शेतकरी सहभागी झाले होते
Posted on: Sun, 01 Dec 2013 13:47:14 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015