मी कॉलेजचा पहिला दिवस - TopicsExpress



          

मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती मुळे खालीच उभा होतो खरतर कोणी नाही आहे आपल्या सोबत ह्याचाच विचार करत होतो मला तर सगळ नवीन आहे, म्हणून फार अडखळत होतो भीतभीतच का होई ना एक एक करत कॉलेज च्या पायरया चढत होतो आठवतंय मला वर्गात सुद्धा एकटाच बेंच वर बसलो होतो सुरवातीलाच काही अविस्मरणीय मित्राची ओळख झाली, धन्यवाद करतो त्यांना, हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. . कॉलेज मध्ये घालवलेला एक एक क्षण आठवत होतो अजून काही मित्राची ओळख होवू दे, म्हणून वर्गातच बसलो होतो नवीन नवीन होते कॉलेज म्हणून सर्व लेक्चर बसत होतो समजत नव्ह्त सुरवातीला की, तरी मन लावून ऐकत होतो नवीन नवीन असताना कॉलेज, मी कॉलेजला रोज येत होतो पण कॉलेज सुटल्यावर मात्र खूप वेळ त्या मित्रासोबतच फिरत होतो विसरू न शकणाऱ्या, त्या सर्व आठवणी, मला कोणी पुन्हा आणून द्या ना हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. . वर्गात मित्रासोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा आठवत होतो बेंचवर सर्व मित्र एकाच बाजूला, ग्रुप नेच बसत होतो सर जे काही सांगतात, त्यातल काही काहीच लिहित होतो वहीवर नाही म्हणून काय झाले? बेंचवर सर्व कोरत होतो सर्व मित्राची नावे पाठ होती, तरी बेंचवर लिहून काढत होतो वहीची मागची पाने तर नवीन नवीन खेळ खेळूनच भरून घेत होतो आता पुढे कोठल्याही खुर्चीत बसलो तरी पुन्हा एकदा बेंचवर बसू द्या ना हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. . कॉलेज मध्ये मित्रांबरोबर फिरलेला एक एक क्षण अजून एकदा आठवत होतो वर्गातून कोणाला बाहेर काढलं तर सर्वच बाहेर जात होतो वर्गात कमी पण कॉलेज समोर कट्ट्यावर रोज तासन तास गप्पा मारत होतो नंतर नंतर सारे, डेफोल्तर (defaulter) लागलेल्या लेक्चरलाच बसत होतो सकाळी सकाळी पहिल्या लेक्चरला फक्त चहाच पियुन येत होतो म्हणून सारे जण त्या वडापावच्या गाडीवर रोजच जात होतो ती कॉलेज ची सर्व वर्षे पुन्हा एकदा कोणीतरी
Posted on: Wed, 25 Sep 2013 17:35:03 +0000

Recently Viewed Topics




© 2015