माझा मित्र "परांजप्यांचा - TopicsExpress



          

माझा मित्र "परांजप्यांचा सचिन" याने दिलेला एक मंत्र माझ्या डॉक्टर मित्रांकारता मी येथे शेअर करतो आहे. वैद्यकीय व्यवसाय हा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जातो....पण तितकाच जास्त तो Risky असुन अनेकदा पेशंटच्या जीवाचा संबंध असल्याने डॉक्टरांना डायग्नोसिस करताना, उपचारपध्दतीचा अवलंब करताना खुप काळजी घ्यावीच लागते, नाहीतर पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. उत्तम वैद्यकीय ज्ञान, अद्ययावत उपचारपध्दती असुनही प्रत्येक पेशंटचे प्रकृतीमान हे निरनिराळे असल्याने प्रत्येकावर होणारे परिणामही वेगवेगळे असतात. आणि त्यात जर खरंच काही नकारात्मक घडलं तर पेशंटचे नातेवाईक consent form वगैरे विसरुन डॉक्टरांवर हल्ले करायलाही मागेपुढे पहात नाहीत....प्रत्येक डॉक्टरकडुन पेशंटवर उत्तम उपचार व्हावेत, त्याला औषध व उपचारांचा गुण यावा, तो लवकर बरा व्हावा यासाठी मी वैद्यकशास्त्राचा, उपचारपध्दतीचा प्रमुख दैवत असलेल्या श्रीधन्वंतरी याचा एक मंत्र देत आहे. प्रत्येक डॉक्टरने रोज सकाळी आंघोळीनंतर, रोजच्या दैनंदिन प्रॅक्टीसला सुरुवात करण्यापुर्वी असा प्रत्येकी 3-3 वेळा हा मंत्र म्हणला तर खुप छान....उपचार करताना योग्य उपचार व्हावेत, स्वत: डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढविणारा असा हा मस्त मंत्र आहे. मंत्र श्रध्देने म्हणावा आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करावे.... ॥ ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये: अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥ अर्थ:- श्रीविष्णुस्वरुप, सुदर्शनधारी धन्वंतरी, ज्यांच्या हाती जीवनरक्षक असा अमृतकलश आहे, जे भयनिवारक आणि रोगनिवारक शक्तीने युक्त असुन, ज्यांचा संचार सर्वत्र, तिन्ही लोकात आहे. औषधांवर ज्यांची पुर्ण सत्ता आहे अशा श्रीधन्वंतरी देवतेस माझे नमन असो...
Posted on: Sun, 28 Jul 2013 11:07:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015