महाराष्ट्रात सुमारे 1 - TopicsExpress



          

महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी शेतकरी आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक वा भांडवलदार, शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी, दलाल, अडते ह्यांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त नसावी. शेतमाल, प्रक्रिया उद्योग इत्यादी संबंधातील बातम्या आणि लेख, मतांतरं इत्यादी मजकूर इकॉनॉमिक टाईम्स, बिझनेस स्टँडर्ड, बिझनेस लाइन इत्यादी वर्तमानपत्रांत सर्वाधिक येतो. शेती आणि शेतमालाचं उत्तम वार्तांकन सीएनबीसी-आवाज इत्यादी वृत्तवाहिन्यांवर अधिक सखोल असतं. मराठी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या बळीराजाचं गुणगान करण्यात, शरद पवार-पृथ्वीराज चव्हान-उद्धव ठाकरे-मुंडे-गडकरी-राज ह्यांच्या बातम्या, गुन्हेगारी, मध्य प्रदेशातल्या निवडणुका, मोदी-राहुल अशा बातम्या देण्यातच धन्यता का मानतात? म्हणजे ज्या वाचक वा दर्शकांमुळे बातम्या मिळतात त्यांना फक्त शहरीकरणाचेच प्रश्न असतात अशी समजूत का आहे? त्यातही माहिती वा बातम्या ह्यांच्यापेक्षा मत वा भूमिका मांडण्यावर का जोर देतात? मराठी माणसांनाही माहितीपेक्षा मतं का महत्वाची वाटतात?
Posted on: Thu, 28 Nov 2013 05:22:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015