साले हे मित्र असतात बाकी - TopicsExpress



          

साले हे मित्र असतात बाकी मस्त. "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?" "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!" हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं. पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! "नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं ! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं! निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त! तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं! उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं! Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं, पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं, तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी, दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात, खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा!
Posted on: Mon, 19 Aug 2013 18:59:37 +0000

Trending Topics



they were the
Wishing everybody a very Happy mother and father day. May they be

Recently Viewed Topics




© 2015