नमस्कार मित्र- - TopicsExpress



          

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो, मी गणेश शिंदे. मी आज आपणांस माझ्या बाबांसोबत घडलेली एक सत्य घटना सांगत आहे. आम्ही सर्व कुटुंब रहायला पवईला. त्यावेळी माझे बाबा शिप्झ मध्ये कामाला होते. ते रोज रात्री ११.३० वाजता कामावरुन सुटत. ही घटना जेव्हा त्यांच्यासोबत घडली त्या दिवशी कामावरुन निघायला बाबांना थोडा उशीरच झाला होता. रात्रीची वेळ होती. त्यावेळेस रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. म्हणतात ना की वेळ आली की सर्व आपल्या मनाविरुद्धच घडते. ते बसची वाट बघत उभे होते. पण बसच काय रिक्क्षा पण खुप वेळ झाला तरी आली नव्हती. मग काय बाबांनी पायीच चालत जायचा विचार पक्का केला. माझ्या बाबांनी चालायला सुरुवात केली. ते जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरुन चालत येत होते. IES शाळेच्या पुढे आल्यावर एक छोटी जुनी बंद पडलेली पोलिस चौकी होती. ती बंद असल्यामुळे त्यात कोणी असेल यात शंकाच नव्हती. तर झाले असे माझे बाबा चालत चालत आता त्या चौकीजवळ येऊन पोहोचले होते. त्यांनी बघितले तर त्या चौकीच्या पाय-यांवर एक माणूस बसला होता. माझ्या बाबांनी त्याला पाहिले, पण बघून न बघितल्यासारखे केले आणि पुढे-पुढे चालतच राहिले. तो माणूस उठला आणि तोही माझ्या बाबांच्या मागोमाग चालू लागल. माझे बाबा आपल्याच धुंदीत चालत होते. त्यांना माहित नव्हते की तो माणूस पण त्यांच्या पाठोपाठ चालत आहे ते. चौकीच्या पुढे एक जंगल होते. त्या जंगलात एक पायवाट होती. ती एकच अशी पायवाट होती की जेथून आमच्या वस्तिपर्यंत येता येत होते. त्या पायवाटेवरुन आमच्या वस्तीपर्यंत चालत यायला जवळ्जवळ अर्धा तास तरी लागत असे. माझे बाबा कधीकधी त्याच पायवाटेवरुन यायचे. त्या दिवशीही उशीर झाल्यामुळे बाबा तेथुनच येत होते. अचानक त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी आपल्या पाठोपाठ चालत येत आहे. बाबा अचानक थांबले. तो माणूस पण थांबला. बाबांनी वळून बघितले तर तोच माणूस होता जो त्या चौकीच्या पाय-यांवर बसला होता. माझे बाबा समझून गेले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे, म्हणून ते भराभर चालू लागले. त्यानंतर थोडे पुढे चालल्यावर वाटेत १ नाला येतो. बाबा त्या नाल्याजवळ आले. ते त्या नाल्याच्या पुढे आले. बाबा त्या नाल्याच्या पुढे आल्यावर त्या माणसाचा पाठीमागुन आवाज आला. आज वाचलास, परत नाही वाचणार. ही घटना माझ्या बाबांबरोबर जवळजवळ १० वर्षांपुर्वी घडली आहे. पण आजही ती घटना आम्हांला सांगताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. आज त्या ठिकणी जंगल आणि चौकी तोडून NSG Commando Training Center उभे आहे. आणि हो त्या ठिकाणी खुप जणांनी आत्महत्या केली आहे आणि खुप जणांचे खुनसुद्धा करण्यात आले आहेत. खरच ही एक सत्य घटना आहे मित्रांनो.......
Posted on: Mon, 29 Jul 2013 18:07:27 +0000

Trending Topics



stbody" style="min-height:30px;">
Holiday Sales SeaSpecs Black Sunset Specs Extreme
he beginning of spring and the beginning of autumn are considered

Recently Viewed Topics




© 2015