वाढत्या वयाबरोबर पुढे - TopicsExpress



          

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली.... कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून भेटले. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या wave lengths पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला...... प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये.... - पु. ल.
Posted on: Sat, 23 Nov 2013 13:16:01 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015